येरवड्यात विजेच्या समस्याने नागरिक हैराण   

येरवडा : येरवडा परिसरात वीज खंडित होत आहे. शिवाय विद्युत समस्या सोडविण्यासाठी महावितरण विद्युत विभाग मुख्य अधिकारी, उपअभियंता यांच्याकडे तक्रारी देऊन दुर्लक्ष करत असलेल्या अधिकार्‍यांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भाजपचे पदाधिकार्‍यांनी केली आहे.भाजप अल्पसख्यांक आघाडीचे माजी अध्यक्ष अन्वर पठाण यांनी नागरिकांच्या समस्य सोडविण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून अधिकारी याबाबत दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी महापालिका व महावितरण अधिकार्‍यांनी तत्काळ समस्या सोडाव्यात अन्यथा येरवडा परिसरातील नागरिक आणि भाजपच्यावतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
 
येरवडा परिसरात अनेक वर्षापासून विजेचे जाळे पसरलेले आहे. तसेच गेल्या तीन वर्षात महावितरण विभागाकडून कोणते विकास कामे केलेली नाहीत. येरवडा परिसरासाठी कोणताही निधी शासनाने किंवा महापालिकेने दिले नसल्याची माहिती वितरण विभागाचे अधिकारी सांगत असल्याची माहिती अन्वर पठाण यांनी दिली. तसेच जून महिन्यात पाऊस सुरू होईल. लोमकळत असलेल्या विजेच्या वायरमुळे लोकांचा जीव जाऊ शकतो. येरवडा परिसरात अनेक विजेचे तारा पसलेल्या आहे. अनेक वेळा तक्रार करून विजेचे तारा काढलेल्या नाहीत. बर्‍याच ठिकाणी विजेच्या तारा खाली पडलेल्या आहेत. यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. यावेळी कदिर शेख, मौलाना रिजवान, बग्गा पठाण गुलाब शेख, रेहान शेख उपस्थित  होते.
 
गेल्या दहा वर्षात येरवडा परिसरात विकास कामे केली आहेत. असा दावा करणार्‍या अधिकार्‍यांनी कुठं केला खर्च, फक्त कागदावरच महवितरणाची कामे दिसत आहेत. ठेकेदार आणि महावितरण, महापालिका विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या खर्चाची माहिती सर्व जनतेपर्यत पोहचवावा. जर अधिकारीच दोषी आढळल्यावर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा कार्यालयात घुसून आंदोलन करणार.
 
अन्वर पठाण- भाजप अल्पसंख्यांक माजी अध्यक्ष. 

Related Articles